पंखांच्या आठवणी – हरवलेल्या गवताळ अधिवासाची कहाणी
मसला खुर्द—तुळजापूर तालुक्यातलं एक छोटं गाव. मातीच्या भिंती, कुडाचं छप्पर, आणि अंगणात चिंचेचं झाड. माझं बालपण याच साधेपणात, पण निसर्गाच्या सान्निध्यात घडलं.—एक गरीब शेतकरी, पावसावर अवलंबून शेती, वर्षभर कष्ट, आणि तरीही हातात फारसं काही उरत नसे. पण त्या जमिनीशी जोडलेली माणसं, श्रमाचं मोल, आणि निसर्गाशी असलेलं नातं मला आतून घडवत होतं. मामाच्या सासुरे गावी मामाबरोबर […]